‘ठाकरे गटाची अनुपस्थिती माफी योग्य नाही’   

मुंबई, (प्रतिनिधी) : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला पहलगामचा बदला घेण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला. मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदारांनी बैठकीला दांडी मारल्याने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या देशाचा इतिहास ठाकरे गट विसरलेला दिसतो. युद्धाची किंवा युद्धसदृश्य परिस्थिती असताना आणि देशावर हल्ला झालेला असताना भारतातील राजकीय पक्षांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याची भूमिका घेतलेली आहे. हा या देशाचा इतिहास आहे. बांगलादेशच्या युद्धादरम्यान देशात राजकीय पक्षांमध्ये टोकाचा संघर्ष होता. तरीही स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी स्व. इंदिरा गांधींना पूर्ण पाठिंबा दिला होता. अशा परिस्थितीत ठाकरे गटाकडून विरोध करणे, उपहास करणे किंवा मूर्खासारखी वक्तव्ये करणे सुरू आहे. देशाची जनता त्यांना माफ करणार नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.
 

Related Articles